जाणून घ्या भाऊबीज का साजरी केली जाते ?


स्वागत आहे आरोग्य मराठी ब्लॉग वर आज आपण माहिती घेणार आहोत भाऊबीज का साजरी केली जाते ? आपण पाहत असाल की दिवाळी ची सुरुवात झाली असून सगळीकडे खुप आनंदाचे वातावरण आहे.

तुम्हाला महित आहे की दिवाळी ची सुरुवात धनत्रयोदशी ने होते, आणि शेवट हा भाऊबीज ने होतो, तर आपण पाहणार आहोत की भाऊबीज साजरी करण्यामगच काय कारण आहे.

भाऊबीज या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करते. त्याला प्रेमाचा टिळा लावते आणि टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी असतो. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो.

Bhaubeej ka sajri kartat
 भाऊबीज


 भाऊबीज का साजरी केली जाते ? हा सन भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक समजला जातो, अस सांगितल जात की यमराज आणि त्यांची बहिन यमुना यांच्या मुळे हा सन साजरा केला जातो.

यमराजला त्यांची बहिन तिच्या घरी येण्यासाठी आमंत्रण देते परंतु खुप कामामुळे यमराज बहिन यमुना हिच्या घरी जाऊ शकले नाही, परंतु कार्तिक शुक्ल या दिवशी यमुना हिने आपला भाऊ यमराज यांना कही वचन बंधनामधे अडकवून आपल्या घरी येणे भाग पाडले.

भाऊ यमराज बहिन यमुना हिला वाइट न वाटण्यासाठी तिच्या घरी पोहचले पण यमराजने बहिन यमुनाच्या घरी जाण्याअगोदर नरकातील सर्व दोषी लोकांना सोडून दिले आणि त्यानंतर यमराज बहिन यमुना च्या घरी पोहचले. आपला भाऊ आपल्याला भेटायला आला हे पाहून यमुना खुप आनंदी झाली त्या दिवशी बहिन यमुनाने आपल्या भावाचे खुप चांगले स्वागत केले. तिने चंदनाचा टीळा लावून यमराजची आरती केली व जेवनासाठी पंचपकवान केले. हे पाहून यमराज खुप खुश झाले व त्यानी यमुनेला कही मागण्यासाठी सांगितले त्यानंतर यमुना हिने आपल्या भावाकडे दरवर्षी भाऊबीज साजरी करण्यासाठी मागणी केली आणि यामराजने हे मान्य केलं. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी भाऊबीज साजरी केली जाते.

Oldest