जाणून घ्या मध खाल्ल्याने होतात हे फायदे Health Benefits of Honey in Marathi

Health Benefits of Honey 
तुम्हला माहित आहे का आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या भरपूर अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होऊ शकतो? तर आज आपण अशाच एका गोष्टी विषयी बोलणार आहोत ती म्हणजे मध. 

मध हा अगदी सहज उपलब्ध होणार पदार्थ आहे. जर आपण गावामध्ये राहत असाल तर तो नक्कीच मिळेल पण जर आपण शहरात राहत असाल तर तो तुम्हाला दुकानात सुद्धा मिळेल. 

Health Benefits of Honey
Health Benefits of Honey 


जाणून घ्या मध खाल्ल्याने होतात हे फायदे


तसे पाहत मध हा एक औषधी वस्तू आहे. मधामध्ये अनेक आजार बरे करण्याची गुणधर्म असतात. जर आपण दररोज एक चमचा मधाचे सेवन केले तर आपणास त्याचे खूप फायदे होऊ शकतात.

मधा मध्ये हे मिश्रण असते 

प्रामुख्याने नैसर्गिक रित्या बनणाऱ्या या मधामध्ये फ्रुक्टोस, ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज अशा अनेक आणि खूप महत्वाच्या शर्करांचे भरपूर प्रमाण असते. फ्रुक्टोस, ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज हे सर्व घटक शरीरासाठी खूप महत्वाचे आणि उपयुक्त घटक आहेत. या सर्वांमध्ये एकूण ७५% साखरेचे प्रमाण असते. मधामध्ये असणारे अमिनो, लोह, आयोडीन, कॅल्शियम, क्लोरीन, फॉस्फरस हे सगळे घटक मधाला खूप गुणकारी बनवतात.

मध खाण्याचे फायदे 

 1. मध हा नैसर्गीक पदार्थ असून त्यामधील गोडवा यामुळे कोणत्याही प्रकारची शरीरातील साखर वाढत नाही. 
 2. जर ब्लड प्रेशर वाढत असेल तर मधाचे सेवन केल्याने तो नियंत्रणात येऊ शकतो.
 3. मध खाल्ल्याने तुमच्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढू शकते.
 4. जर तुम्हाला हिवाळ्यात सर्दी खोकला जळजळ असा त्रास होत असेल तर मधाच्या सेवनाने तुमचा हा त्रास खूप लवकर बारा होऊ शकतो.
 5. जर तुम्हला पटकन भूक लागत नसेल तर मधाच्या सेवनाने तुमचे भुकेचे प्रमाण वाढू शकते.
 6. रक्ताला स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही मधाचा वापर करू शकतात.
 7. दररोज कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्याने तुमचे पोट हलके राहू शकते.
 8. मधाच्या सेवनाने किडनी आणि आतडे चांगले राहतात.
 9. मधाच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 
 10. जर मधाचे सेवन अमरसाबरोबर केले तर कावीळ पासून दूर राहण्यास मदत होते.
 11. कफ आणि दमा यांच्यासाठी मध हा एक चांगला उपाय आहे. मधामुळे कफ आणि दमा यांसारखे आजार दूर होऊ शकतात.
 12. त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने तुमची पाचन शक्ती सुधारण्यास मदत होते.
Health Benefits of Honey हि माहिती आपणास कशी वाटली खाली कंमेंट करून नक्की कळवा. आणि हि माहिती आपल्या मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर FACEBOOK आणि WHATS APP द्वारे नक्की SHARE करा.
Previous
Next Post »