जाणून घ्या कशी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षाव्यवस्था

जर नरेंद्र मोदी कोण आहेत ? आसा प्रश्न विचारला तर तो चुकीचा ठरेल कारण असा आपल्या देशात व्यक्ती नसेल त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विषयी ऐकलेलं नसेल. तर या आजच्या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थे विषयी तर चला पाहूया कशी काम करते माननीय पंतप्रधान यांची सुरक्षाव्यवस्था.


नरेंद्र मोदी यांची सुरक्षाव्यवस्था
नरेंद्र मोदी यांची सुरक्षाव्यवस्था 

कशी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षाव्यवस्था 

आपल्या देशाची राजधानी दिल्ली आसल्यामुळे पंतप्रधान यांचं निवासस्थान दिल्ली येथे आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान यांचे निवास्थान हे ७ लोक कल्ल्याण मार्ग येथे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान हे तब्बल १२ एक्कर मध्ये बनवलेलं आहे. त्याला ७ लोक कल्ल्याण संकुल म्हणलं जात. मुख्यता या संकुल मध्ये ५ बंगले आहेत. त्या प्रत्येक बंगल्याला वेगवेगळ्या अंकांनी (१,३,५,७,९) नावे दिली गेली आहेत. 

५ नुंबरच्या बंगल्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतात, तर ७ नुंबरच्या बंगल्यात त्यांचं कार्यालय आहे. ३ नुंबरच्या बंगल्यात खूप मोठी कॉन्फरन्स रूम आहे जिथे चर्चा केली जाते. १ नुंबरच्या बंगल्यामध्ये हेलिपॅड आहे. तर ९ नुंबरच्या बंगल्यात SPG च ऑफिस आहे.

या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्यातून विमानतळापर्यंत थेट भुयारी मार्ग आहे. या सर्व १२ एक्कर च्या बंगल्याला फक्त एक प्रवेशद्वार आहे जिथे SPG चा २४ तास पहारा असतो.

शिवाय सर्व बंगल्यांच्या काचा आश्या आहेत कि कोणाही रासायनिक आणि जैविक हल्ला झाला तरी बंगल्याच्या आत मधील व्यक्ती सुरक्षित राहू शकतात.

पंतप्रधानांना भेटणं हे तितकं सोपं नसत, नातेवाईकांना किंवा मित्रांना सुद्धा सहज भेटता येत नाही. दिवसात किती लोक पंतप्रधानांना भेटणार आहेत याची यादी त्यांच्या सचिवांकडे यांनी बरोबरच SPG कडे असते. जर नातेवाईक आणि मित्र आपल्या गाडीने भेटीसाठी आले असतील तर त्यांना त्यांची गाडी गेटवरच थांबावी लागते आन नंतर कडक सुरक्षा तपासणीनंतर SPG यांच्या वाहनाने आत सोडले जाते.

पंतप्रधानांना वाढणाऱ्या अन्नाची पण आधी चौकशी होते आणि मगच ते त्यांना खाण्यासाठी दिले जाते. तसेच ७ लोक कल्ल्याण संकुल  चे आकाश हे नो फ्लयिंग झोन आहे म्हणजे कोणत्याही परिस्थिती मध्ये कोणतेही विमान बंगल्यावरून जाऊ शकत नाही. अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा व्यवस्था काम करते. 

Previous
Next Post »