Goat Farming Information in Marathi - शेळीपालन माहिती

Goat Farming Information in Marathi - नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या शेतीला जोडव्यवसाय म्हणून ओळखणाऱ्या व्यवसाय बद्दल तर आपण बोलणार आहोत शेळीपालन व्यवसाय विषयी.

आजच्या वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक  चांगल्या शेतीला जोडव्यवसाय करणे गरजेचे आहे.

तर शेळी पालन हा व्यवसाय शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो म्हणून तुम्ही पण या व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे.

शेळीपालन हा व्यवसाय अगदी कमी पैशांमध्ये सुरु होणारा व्यवसाय आहे. तुम्ही खूप कमी पैसे खर्च करून सुद्धा हा व्यवसाय सुरु करू शकता.

आपल्या महाराष्ट्र मध्ये खूप शेतकरी आहेत जे शेळीपालन हा व्यवसाय अगदी उत्तमपणे करून चांगले उत्पन्न घेत असून चांगला नफा सुद्धा मिळवत आहेत.


Goat Farming Information in Marathi
Goat Farming Information in Marathi

शेळीपालन माहिती Goat Information in Marathi

शेळीपालन करण्यापूर्वी काही भांडवलाची गरज पडते ते भांडवल खूप कमी पण असू शकते किंवा जास्त पण आसू शकते.

असे म्हणण्याचे कारण हे आहे जर तुम्ही शेळीपालन मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार  करत असाल तर तुम्हला सुरवातीचा खर्च सुद्धा अधिक असणार आहे.

शेळीपालन साठी सरकारी योजना 


शेळीपालन करण्यासाठी तुम्ही सरकारी योजनांचा सुद्धा आधार घेऊ शकता. जार तुम्ही सरकारी योजनांचा आधार घेत असाल तर तुम्हला काही प्रमाणात व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान मिळू शकते.

तुम्ही जर सरकारी योजनांचा आधार घेतला तर तुम्हला या व्यवसायासाठी ५०% ते  ७५%  अनुदान मिळू शकते.

तुम्हला शेळीपालनासाठी लागणार खर्च याद्वारे दिला जाईल. तुम्हला शेळ्या विकत घेण्यासाठी व त्यांच्या निवाऱ्यासाठी व चारा तसेच  लागणारी जागा यासाठी तुम्हला सरकारी मदत मिळू शकते.

शेळीपालन आणि त्यांच्या जाती 

भारताच्या हमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत विविध जातींच्या शेळ्या तुम्हला पाहायला मिळतात.

हिमालयीन शेळ्या - शिमलायीन शेळ्या या तुम्हला कश्मीर, उत्तरप्रदेश, बिहार राज्यात पाहायला मिळतात. या शेळ्यांपासून पश्मिना लोकर आणि चांगल्या प्रकारचे मांस मिळते.

भारतात बकऱ्यांच्या जवळपास २५ पेक्षा अधिक जाती आढळून येतात.

त्यामध्ये देशी शेळ्या आणि विदेशी शेळ्या असा फरक दिसून येतो.

देशी शेळ्या (भारतीय जाती) -

 भारतीय जातींमध्ये सुरती, बीटल, जमनापरी, बरबेरी, सुरती या जातींच्या शेळ्या ह्या प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी पाळल्या जातात.

तर उस्मानाबादी, संगमनेरी, अजमेरी इत्यादी जातीच्या शेळ्या या मांसासाठी पाळल्या जातात. 

विदेशी शेळ्या (विदेशी जाती) -

विदेशी शेळ्यांमध्ये विविध प्रकारच्या जाती पाहायला मिळतात. तसे पाहता विदेशी शेळ्यांची वाढ हि खूप झपाट्याने होत असते.

या जातींमध्ये प्रामुख्याने अल्पाईन, टोगेनबर्ग, अंगोरा, सानेन तसेच ऍग्लोन्यूबियन या जातींचा समावेश होतो.

विदेशी शेळ्यांच्या वजनामध्ये खूप झपाट्याने वाढ होत असते. त्यांचे वजन १०० किलोच्या आसपास पाहायला मिळती.

नराचे वजन हे १०० ते १२५ किलोच्या तर मादी चे वजन हे ९० ते १०० किलोच्या जवळ असते.


शेळीपालन पद्धती आणि त्यांचे प्रकार 

तसे पाहता शेळीपालन पद्धती मध्ये दोन प्रकार पडतात.


  1. बंदिस्त शेळीपालन पद्धत 
  2. अर्धबंदिस्त शेळीपालन पद्धत 

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेळीपालन हा व्यवसाय केला जातो. खूप साऱ्या जिल्यांमध्ये पारंपारिक शेळीपालन हा व्यवसाय केला जतो. 

पारंपरिक शेळीपालन यामध्ये शेळ्यांना मोकळ्या शिवरामध्ये चारण्यासाठी सोडण्यात येते.

बंदिस्त शेळीपालन पद्धत 

बंदिस्त शेळीपालन हे प्रामुख्याने मोठ्या व्यवसायाच्या हेतून सुरु करण्यात येते. याप्रकारच्या व्यवसायामध्ये नियोजन हे खूप महत्वाचे असते.

इथे ५० ते १०० शेळ्या या एकाच ठकाणी असतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे तेवढेच महत्वाचे असते. 

बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या या २४ तास एकाच ठिकाणी बांधून असतात. त्यांचे पाणी व चार हे एकाच छताखाली करावे लागते.

यामध्ये करडांसाठी वेगळे तर शेळ्यांसाठी वेगळे असा निवार करावा लागतो. जेणेकरून करडांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये.

त्याचबरोबर शेळ्यांना थोडी मोकळीक मिळण्यासाठी गोठ्याबाहेर थोडी जागा असावी.

अर्धबंदिस्त शेळीपालन पद्धत 

अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये पारंपरिक शेळीपालनाचा समावेश होतो. जिथे शेळ्यांना पूर्णवेळ बांधून ठेवण्यात येत नाही.

या प्रकारच्या शेळीपालनामध्ये शेळ्या फक्त रात्रीच्या विसाव्यासाठी गोठ्यामध्ये बंदिस्त असतात तर इतर वेळ शेळ्या या चारण्यासाठी शिवरामध्ये किंवा माळरानावर असतात.

या प्रकारच्या शेळीपालनामध्ये शेळ्यांच्या चाऱ्यावर खूप असा खर्च येत नाही. 

अधबंदिस्त प्रकारचे शेळीपालन हे खूप कमी खर्चामध्ये सुद्धा सुरु करणे शक्य आहे. तसेच खूप कमी शेळ्या घेऊन सुद्धा सुरु करणे शक्य आहे.

शेळ्यांचा आहार (चारा)

शेळीपालनामध्ये शेळ्यांच्या आहार हा खुप महत्वाचा भाग असतो. शेळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार मिळणे तेवढेच महत्वाचे असते.

जर शेळ्यांना योग्य आहार दिला गेला तर शेळ्यांची अगदी कमी दिवसात खूप चांगली वाढ होऊन तुम्हला चांगले उत्पादन भेटण्यास मदत मिळते.

शेळ्यांना होणारे विविध आजार हे मोठ्याप्रमाणात आहारावर अवलंबून असतात. जर अयोग्य आहार दिला गेला तर शेळ्या आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.

आहारामध्ये प्रामुख्याने हिरवा चारा म्हणजे गवत, बोराटया, बाभळीचा पाला, घास तसेच मका यांचा समावेश असावा.

वाळलेल्या चाऱ्यामध्ये बारीक केलेली वैरण तारसेच कडधान्यांचा भुसा यांचा समावेश असावा.

त्याचप्रमाणे जर शेळ्यांना सरकी पेंड किंवा पत्री पेंड दिली तर शेळ्यांची वाढ अगदी झपाट्याने होण्यास मदत होते.

नेहमी शेळ्यांना स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. शेळ्या आजारी पाडण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे पाणी असते.
त्यामुळे शेळ्यांना चांगले पाणी पिण्यास देणे खूप महत्वाचे असते.

शेळीपालनाचे फायदे 

  1. शेळीपालन हा व्यवसाय अगदी कमी भांडवलाच्या मदतीने सुरु करण्यायोग्य व्यवसाय आहे.
  2. कमी दिवसात जास्त माफ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.
  3. शेळी हि १४ महिण्यात दोन वेळा वितात त्यामुळे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
  4. शेळ्यांमध्ये दोन पिल्लांना जन्म देण्याची शक्यता अधिक असल्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय खूप फायदेशीर असतो.
  5. शेळींपासून मिळणारे दूध हे खूप चांगल्या प्रतीचे असल्यामुळे शेळीपालन केले जाते.
  6. मांस हे प्रमुख कारण आहे ज्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय खूप मोठ्याप्रमाणात केला जातो.
  7. शेळ्यांच्या विष्टे पासून मिळणारे खात हे चांगल्या प्रकारचे असते. त्याचा उपयोग शेतामध्ये केला जातो.
  8. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यामध्ये सुद्धा शेळीपालन केले जाऊ शकते.
तुम्हला शेळीपालनाविषयी माहिती कशी वाटली आम्हला कंमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही करत असलेल्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहचावा.

प्रेरणादायी मराठी सुविचार
Good Morning Messages in Marathi

Previous
Next Post »