पावसाळा मराठी निबंध | Rainy Season Essay in Marathi

पावसाळा कोणाला आवडत नाही प्रत्येक व्यक्ती ही या पावसाळा ऋतुची वाट पाहत असतो. तसेच बच्चे कंपनी तर खूपच खुश असते.

तर आज आपण पाहणार आहोत की पावसाळा विषयावर निबंध. तर खूप साऱ्या शाळेमध्ये मुलांना पावसाळा विषयावर निबंध लिहायला सांगितले जाते.

जर तुम्हाला सुध्दा पावसाळा विषयावर निबंध विषयी माहिती हवी आसेल तर तुम्ही नक्की हा लेख पूर्णपणे वाचवा.

Rainy Season Essay in Marathi
Rainy Season Essay in Marathi

पावसाळा मराठी निबंध | Rainy Season Essay in Marathi


पावसाळा म्हटलं की आठवण होते थंडगार वातावरणाची आणि सर्वकडे दिसणारी हिरवीगार गवताची चादर.

खूप सुंदर असा नजर पावसाळ्यामध्ये पहावयास मिळतो. उन्हाळ्याचे चार महिने संपल्यानंतर लोकांना चाहूल लागते ती म्हणजे पावसाळा सुरू होण्याची.

तसे पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याची सुरुवात ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून होत असते.

तसे पाहता पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या पावसाची मज्जा काहीतरी वेगळीच असते.

पहिल्या पावसात मातीतून येणार सुगंध खूप चांगला असतो ज्यांनी हा सुगंध अनुभवला आहे त्यांना जीवनभर लक्षात राहील असा हा सुगंध असतो.

सर्वात जास्त म्हणजे बच्चे कंपनी तर पहिल्या पावसासाठी खूपच उस्तुक असते.

त्यामुळे जसा पहिला पाऊस सुरू होतो सर्व लहान मुले पावसामध्ये भिजण्यासाठी एकत्र येतात आणि पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेतात.

सर्वात जास्त पावसाची ज्या माणसाला गरज असते तो म्हणजे शेतकरी राजा. शेतकऱ्यांना ज्याची गरज असते तो म्हणजे पाऊस.

पहिला पाऊस पडल्यानंतर सकाळी "पेरते व्हा" असा पावश्याचा (एक प्रकारचा पक्षी) येणार आवाज हा शेतकरी राजाला वेगळाच आनंद देतो.

"पेरते व्हा" हा पावश्याचा शेतकऱ्यांना संकेत असतो की आता पाऊस आलेला आहे आणि तुम्ही शेतीची कामे सुरू करा.

शेतकरी सुध्दा खूप उत्साहाने शेतीच्या कामांना सुरुवात करतात.

जुलै या महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढते आणि नद्या नाले तुडुंब भारतात. 

नद्यांमधून बेडकांच्या आवाज येऊ लागतो आणि तो आवाज खूप दूरपर्यंत घुमतो.

माळरानावर रंगीबिरंगी फुलपाखरे दिसू लागतात आणि लहान मुले त्यांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात.

डोंगर दऱ्या हिरव्या गवताच्या चादरीने भरून जातात आणि वातावरणामध्ये सुंदर असा गारवा निर्माण होतो.

या दिवसांमध्ये खूप साऱ्या पर्यटकांना उंचावरून पडणाऱ्या धबधब्याचा आवाज खुणावत असतो. याच कारणांमुळे खूप पर्यटक हे डोंगरदऱ्या मध्ये या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जात असतात.

माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी हे पाणी हाच पावसाळा घेऊन येत असतो.

सगळीकडे सुखाचे आणि समृद्धी चे वातावरण हा पावसाळा घेऊन येत असतो. 

Previous
Next Post »