आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत. ह्या दिवसात आपल्या शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे पाय फुटणे, अंगाला खाज येणे, पिंपल्स येणे, सुरकुत्या पडणे अशा अनेक प्रकारच्या विविध अडचणी निर्माण होतात.
पावसात ओली झालेली त्वचा अचानक थंड पडल्याने शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आपल्याला या समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्वांवर योग्य वेळी आणि योग्य असा उपचार नाही केला तर थंडीच्या दिवसात हे प्रकार खूप त्रासदायक ठरू शकतात.त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी काही उपाय पुढीलप्रमाणे फायदेशीर ठरतात.
- सब्जा हा सुद्धा एक गुणकारी उपाय आहे.. रात्री थोडा सब्जा पाण्यात भिजत घालून सकाळी अनाशी पोटी प्यावा.पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते. ज्यांना थंडीत वारंवार सर्दी होत असेल त्यांनी हा उपाय आठवड्यातून दोनदाच करावा.
- थंडीत वयस्करांना वाताचा त्रास चालू होतो. कधी कधी नीट चालता सुद्धा येत नाही. अशावेळी गोमूत्र एक वाटीभर घेऊन सकाळी आणि संध्याकाळी रोज आपल्या पायांचा मसाज करावा. भरपूर प्रमाणात फरक पडतो.
- पळस (पिंपळ) ह्याचा सुद्धा एक गुणकारी उपयोग आहे. पूर्वी ह्या पानांच्या पत्रावळी तयार केल्या जातं.. त्यात अन्न ग्रहण करण्याचा उपभोग असा की अन्नातील बहुतांश उष्णता खेचून आपल्याला रुचकर आणि सात्विक जेवणाचा लाभ होई. पळसाला पाने तीन.अशा या तीन पानांच्या झाडाचे जर रस काढून सकाळ संध्यकाळ उपाशी पोटी प्यायल्यास उष्णता आणि पोटाचा घेर सुद्धा कमी होतो.
हळदीचे त्वचेसाठी गुणकारी उपाय 👉: https://www.arogyamarathi.in/2020/11/benefits-of-turmeric-in-marathi.html
- तसेच आपल्या त्वचेवर कोरफडीचा गर जर लावला तर त्वचा सुद्धा मुलायम आणि नरम होते. रात्री जर लावून झोपलात तरी त्वचेचा खरखरीतपणा निघून जाऊन शरीराला थंडावा मिळतो.
- पायांना पडलेल्या भेगांवर एक उपाय म्हणजे तुरटी. तुरटीचा बारीक चुरा करून त्यात थोडे पाणी घालून ते 10-15 मिनिट मुरायला ठेवावे. मग थोडासा कापूस घेऊन त्यात थोडा भिजवून जिथे भेगा पडल्यात किंवा कुसलेल्या ठिकाणी लावल्यावर पाय लगेच नरम पडून बरे होतात. हा खूप उपयुक्त आणि गुणकारी,नैसर्गिक उपाय त्वचेसाठी फायदेशीर आहे.
- उंबराच पिकलेलं फळ सुद्धा खूप औषधी असतं. पिकलेली उंबराची तीन ते चार फळं घेऊन ती कुस्करून त्यात लिंबाचे थोडेसे थेंब टाकून चांगले एकजीव करून चेहऱ्यासकट पूर्ण शरीराला लावून 2 तासांनी थंड पाण्याने धुवावे. त्वचा मुलायम राहून त्वचेला आराम मिळतो. त्वचेचे बरेचसे आजार कमी होण्यास मदत होते.
ConversionConversion EmoticonEmoticon