Benefits of Turmeric in Marathi | जाणून घ्या हळदीचे औषधी गुणधर्म

Turmeric information in Marathi - हळद हा एक भारतीय आहारातील प्रमुख घटक आहे. भारतामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला हळदीचा वापर केलेला आढळून येईल.

हळद ही एक औषधी गुणधर्म असणार घटक असल्यामुळे त्याचा उपयोग जास्त प्रमाणत आहारामध्ये केला जातो. तसाच हळदीमुळे जेवणाला रंग येण्यास तसेच चव येण्यास मदत होते.

Benefits of Turmeric in Marathi
 Benefits of Turmeric in Marathi

Benefits of Turmeric in Marathi

१. हळदीचे पाणी दररोज प्यायलाने रक्त गोठत नाही आणि रक्त शुद्ध व साफ होण्यास मदत होते.

२. शरीरामध्ये थकवा जाणवत असेल तर हळद घातलेला काढा उकळून प्यायल्यास थकवा कमी होण्यास मदत होते.

३. हळदीचे सेवन आहारात केल्यामुळे शरीरात पित्त वज्ञास मदत होते आणि आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

४. एखादी नाजूक जखम झाली असेल तर हळदीचा लेप जखमेवर लावल्यावर जखम भरण्यास मदत होते.

५. एखाद्या जागी मार लागल्यावर हळदीचा लेप लावला तर सूज कमी होण्यास तसेच वेदना कमी होण्यास मदत होते.

६. हळदीचा उपयोग सौदर्य वाढवण्यासाठी सुधा केला जातो.

७. हळद आणि बेसन एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्याव लावला तर चेहरा उजळण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

८. चेहऱ्यावरील डाग किंवा मुरूम कमी करण्यासाठी सुध्दा हळदीचा उपयोग होतो.

९. गरम पाण्यात हळद, लिंबू आणि मध टाकून प्यायल्याने शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

हळदीचे प्रकार - Types of turmeric in Marathi

हळदीचे दोन प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळतात. ते म्हणजे रानहळद आणि आंबेहळद.
  • रानहळद
  • आंबेहळद

रानहळद म्हणजे काय? - Wild turmeric in Marathi

रानहळदीला कस्तुरी हळद (Kasturi turmeric)असेही बोलले जाते. हि एक हळदीची जात आहे. नावामध्ये आपल्याला कळेल कि हि हळद फक्त जंगली भागामध्ये आढळून येते. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सध्या स्थितीला रानहळद हि फक्त भारतामध्ये आढळून येते. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वत रंगामंध्ये अजूनही रानहळद पाहायला मिळते.

रानहळद म्हणजेच कस्तुरी हळदीचे कंद हे आकाराने खूप मोठे असतात. या कंदाचा रंग हा बाहेरून पिवळसर असतो तर आतमध्ये नारंगी असतो. रानहळदीचा वास हा कापराप्रमाणे असतो.

रानहळद/कस्तुरी हळदीचे औषधी गुणधर्म

आयुर्वेदामधे रानहळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक मोठी मोठी आजार रानहळद/कस्तुरी हळदीमुळे बरे होऊ शकतात.

मुका मार लागलेला असेल आणि त्या भागावर सूज आलेली असेल तर रान हळद तेलामध्ये गरम करून त्याचा लेप मार लागलेल्या भागावर लावला तर सूज कमी होण्यास मदत होते.

आंबेहळद म्हणजे काय? - What is Amba turmeric

जुन्या काली आंबा हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे. घरगुती आजार बरे करण्यासाठी आंबेहळद हा एक रामबाण उपाय होता. एखाद्या जागेवर मुका मर लागला असेल तर आंबेहळदीने सूज कमी होण्यासाठी मदत होते.

आंबेहळद औषधी गुणधर्म - Amba turmeric in Marathi

एखाद्या जागेवर रक्त सकाळले असेल तर आंबेहळद उगाळून त्यावर लावल्याने त्याचा फायदा होतो.

शरीरावर गाठ आलेली असेल तर अबेहळदीच्या लेपाने गाठ बसून जाते.

मुका मार लागला असेल तर त्यावर आंबेहळद लावावी त्यामुळे सूज कमी होतेच बरोबर वेदनाही कमी होण्यास मदत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या